व्यथा एसटी (Msrtc) ची

0
531

एसटी (Msrtc) ची व्यथा आवडले तर अभिप्राय द्या….

एसटी म्हणाली माझ्यापाशी आहेत अनुभव रग्गड

कितीतरी आंदोलनात माझ्यावरच पहिला दगड

पिसाट होऊन धावतात येतात माझ्या अंगावर

भरवसा तरी नेमका आता ठेवू कोणत्या रंगावर

कधी उभी पेटवतात कधी काचेवरच भागते

भर रस्त्यात वस्त्रहरण सहन करावे लागते

जखम असेल मामुली तर मलमपट्टी लावते

पुन्हा नव्या दमाने सेवेसाठी धावते

मी असहाय म्हणूनच सोकावलेत सारे षंढ

माझ्या मनातला ज्वालामुखी भविष्यात करेल बंड

तुमच्याच आया बहिणींना लेकरांना नेते मजेने

तुम्ही मात्र परतफेड करता नेहमी सजेने

तुमच्या भंपक ‘मर्दानगी’ची किळस

आता यायला लागली

तुमच्यामुळे पोरं सोरंहीहाती दगड घ्यायला लागली

वस्ती गाव शहरांपर्यंत पोचवा माझी व्यथा

हीच विनंती शेवटची समजून घ्यावे

आता सांगतोय माझ्यावर पडलेला दगड अन पेटता बोळा

दंगेखोर पकडून सारेच भरपाई करा गोळा

© Murari Deshpande

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here