शिवशाही जाणार आता गुजरात पर्यंत…..

0
2556
shivshahi

शिवशाही जाणार आता गुजरात पर्यंत…..

मुंबई व ठाणेच्या गुजराती लोकांना होणार फायदा ,

गुजरातच्या परिवहन विभागाकडे पाठविला प्रस्ताव

(सौ.myमहामायनगर) एसटी(MSRTC) महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बसेस येणार्‍या काळात थेट गुजरातमध्ये दिसण्याची शक्यता आहे. बोरिवली ते अहमदाबाद आणि मुलुंड ते वडोदरा या मार्गावर शिवशाही धावणार आहे. तसा प्रस्ताव गुजरातच्या परिवहन विभागाला पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्यापही याला मंजुरी मिळालेली नाही. लवकरच यावर मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खासगी बसेसची स्पर्धा तोडण्यासाठी वातानुकूलित आणि आरामदायी शिवशाही बसेसची सुरुवात केली आहे. याला प्रतिसादसुद्धा उत्तम मिळत आहे. त्याचप्रमाणे आता एसटीच्या शिवशाही बसेस गुजरातपर्यंत धावणार आहेत. मुंबई आणि ठाण्यामध्ये गुजरातमधील लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथील नागरिकांना गुजरातमध्ये जाण्यासाठी खासगी बसेस आणि रेल्वेतून जावे लागते. मात्र, आता एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि खासगी बसेसची मक्तेदारी संपविण्यासाठी बोरिवली-अहमदाबाद बस मार्गावर शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधित मंजुरीसाठीचा प्रस्ताव गुजरातच्या परिवहन विभागाला एसटी महामंडळाने पाठविला आहे. मात्र, जोपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत शिवशाही बसेस सुरू होणार नाहीत.

सध्या एसटी महामंडळाच्या ठाणे आणि मुंबई विभागातून शिवशाहीचे सर्व मार्ग नफ्याचे असून, एसटी महामंडळाने आता गुजरात राज्यात शिरकाव करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शिवशाही बसेस अहमदाबाद आणि वडोदरा येथे धाडण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन विभागाने मंजूर केला असून, यातील बोरिवली-अहमदाबाद या बस सेवेला गुजरात राज्य परिवहन महामंडळाची मान्यता मिळायची आहे. या संबंधित आम्ही एसटीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शिवशाही वातानुकूलित बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेव्हा, त्या-त्या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार बस सेवा पुरवली जाते.

गुजरातमध्ये मोठा प्रतिसाद
मुंबई आणि ठाण्यामध्ये गुजराती लोकांची संख्या

cropped

जास्त आहे. त्यामुळे येथील नागरिकांना गुजरातमध्ये जाण्यासाठी खासगी बसेस आणि रेल्वेचा वापर करावा लागतो. तेव्हा खासगी बसेसकडून प्रवाशांची नेहमीच लूट केली जाते. त्यामुळे मुंबई आणि ठाण्याच्या गुजराती प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाने गुजरातपर्यंत शिवशाही चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर बोरिवली ते अहमदाबाद आणि मुलुंड ते वडोदरा या मार्गावर शिवशाहीला मोठ्या प्रतिसाद मिळण्याची शक्यता एसटी महामंडळाकडून वर्तविण्यात येत आहे, तर दुसरीकडे गुजरात परिवहन विभाग या शिवशाहीच्या प्रस्तावाला मान्यता देतात की नाही यावरसुद्धा एसटी महामंडळाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here