पंढरपुरात एसटी महामंडळ बांधणार भव्य भक्त निवास,नवे बसस्थानक

0
2007

पंढरीत राज्य परिवहन एसटी महामंडळ MSRTC बांधणार भव्य भक्त निवास व नवे बसस्थानक

(सौ. पंढरी वार्ता…)

21 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर

शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या पाठपुराव्यास यश

img 20190118 1040142355931982169783973269

ना.दिवाकर रावते यांची आश्‍वासन पुर्ती

#MYMSRTC

पंढरीतील चंद्रभागा मैदानाच्या विस्तीर्ण मैदानाचा उपयोग यात्रा कालावधीत तात्पुरते एसटी बसस्थानक म्हणून होत आला आहे.इतर वेळी हे मैदान वापराअभावी पडून असते,यात्रा कालावधीत या ठिकाणी तात्पुरते बसस्थानक उभारण्यासाठी राज्य परिवहन महांंडळाकडून लाखो रुपये खर्च केले जात होते.प्रतिवर्षी खर्च करण्यात रक्कम पाहता या ठिकाणी स्थायी स्वरुपात बसस्थानकाची इमारत बांधली जावी अशी मागणी शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केली होती याची दखल घेत ना.दिवाकर रावते यांनी या कामास मंंजूरी दिली होती.या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच कामास सुरुवात होणार आहे.

राज्यातील जवळपास सर्वच बसस्थानकातून तिर्थक्षेत्र पंढरपूरसाठी नियमित एस.टी.बस सोडली जात असल्याने या गाडया घेवून येणार्‍या चालक वाहकांसाठी येथील जुन्या बसस्थानकाच्या आवारातील कर्मचारी विश्रांतीगृह अपुरे पडत होते.तसेच ही इमारत जुनी झाल्यामुळे तसेच येथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने कर्मचार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.त्याच बरोबर यात्रा कालावधीत नियंत्रणासाठी आलेल्या परिवहन विभागाच्या वरिष्ठ आधिकार्‍यांनाही येथील खाजगी लॉजचा आश्रय घ्यावा लागत होता.परिवहन मंत्री दिवाकर रावते हे पंढरपूर दौर्‍यावर आल्यानंतर शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी या समस्येबाबत ना.रावते यांना निवेदन दिले होते.त्याची दखल घेत चंद्रभागा मैदान येथे आता परिवहन विभागाच्या वतीने 21 कोटी 84 लाख रुपये खर्चुन भव्य बसस्थानक व भक्त निवास उभारले जाणार आहे.

पंढरपूर शहरातील नविन बसस्थानकातील कॉक्रिटीकरणासाठीही ना.दिवाकर रावते यांनी निधी उपलब्ध करुन दिला असून हे काम लवकरच पुर्ण होणार असल्याची माहीती संभाजी शिंदे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली.त्याच बरोबर शहरातील नविन बसस्थानकाच्या परिसरात पश्‍चिमेकडील रेल्वे रुळाच्या बाजूस मिनी गाळे बांधून ते बेरोजगार युवकांना देण्यासाठी आपण ना.दिवाकर रावते यांच्याकडे पाठपुरावा करीत असल्याची माहीती संभाजी शिंदे यांनी पंढरी वार्तास दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here