- माऊलीला आपल्या लेकरा पर्यंत आणणारी एस टी ( Msrtc)
अरं लेका, मी पोचली रं, येतेच १० मिनटात. स्टँड वर येतुयेस नव्हं घ्यायाला .
जन्मापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आपला लाडका लेक शिक्षण झाल्यावर कामानिमित्ताने गावाहून मुंबईला आला. आणि गावाला पारखा झाला. पुढे वर्षात अगदी मोजक्याच दिवशी जेव्हा तो सुट्टीला घरी येतो, तेव्हा त्याची उठबस करण्यात आणि लाड करण्यातच वेळ कसा जातो कळत नाही, आणि तो जाण्याची वेळ येते. मग साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला जातो. लग्नानंतर तर गावाकडे येणे पण जमत नाही. मग लेकाला – सुनेला – नातवांना भेटायला ती आई शहरात येते. येते वेळी आपल्या लेकाला गावचे धान्य, भाज्या वगैरे काय काय घेऊन येतात. वडील मात्र गावी घरीच. अशीच ही एक गावाकडची आई .
त्यांना लेकाला भेटण्याची एवढी ओढ, की पनवेल यायला अजून १०-१५ मिनिट्स असताना देखील आधीच पुढे येऊन बसल्या. सोबत सामान तर अबब! एस टी मध्ये समोरच्या जागेत खूप ह्यांचेच सामान ठेवले होते. सोबत हरभरा तो ही पाल्यासकट. ताजा ताजा शेतातून आणलेला. पनवेल आल्यावर त्यांच्या डोळ्यातली आर्तता सर्व काही सांगून जात होती. लेकाला लगेच फोन लावला आणि म्हणाल्या, ” अरं लेका, मी पोचली रं, येतेच १० मिनटात. स्टँड वर येतुयेस नव्हं घ्यायाला “.
न जाणो, अशा कित्येक माऊली आणि वडील आपल्या लेकांसाठी गावाहून मुंबई – पुण्यात येतात आणि ४ दिवस आनंदात घालवून पुन्हा गावी परततात .
शेवगाव ( अहमदनगर जिल्हा ) – मुंबई सेंट्रल बसने येणारी ही माऊली लाडक्या लेकाशी फोनवर बोलताना.
लेखक माहित नाही फेसबुक वरून पोस्ट….