प्रत्येक आगारात एसटी बांधणार सर्वसोई युक्त विश्रामगृह

1
2762

प्रत्येक आगारात एसटी बांधणार सर्वसोई युक्त विश्रामगृह

चालक-वाहकांसाठी सुविधा : परिवहन मंत्र्यांचाही “ग्रीन सिग्नल”

दिवसभर प्रवास करुन थकलेल्या चालक आणि वाहकांना दिलासा देण्याचा आणि त्यांना आरामदायी सुविधा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक आगारात त्यांच्यासाठी वातानुकूलित तसेच सुसज्ज अशी विश्रामगृहे बांधण्याचा संकल्प महामंडळाने सोडला आहे…

वाहक आणि चालकांनी दिवसभराचा प्रवास करुनही त्यांना मुक्कामाच्या ठिकाणी आरामासाठी पुरेसे विश्रामगृह व सोई नाहीत, त्याशिवाय त्यांना अन्य सुविधाही मिळत नाहीत. त्याबाबत कामगार संघटनांच्या वतीने आतापर्यंत महामंडळ आणि राज्य शासन यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

परंतु, त्यांना आश्‍वासनाच्या शिवाय हाती काहीच लागले नाही, त्यामुळे यासाठी पुढाकार घेण्याची विनंती महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांना करण्यात आली होती. त्यानुसार रावते यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन अत्याधुनिक आणि वातानुकूलित विश्रामगृहे बांधण्याचा निर्णय घेतला असून ही योजना लवकरच प्रत्यक्षात अंमलात आणण्यात येणार आहे. अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.

यासंदर्भात एसटी कामगार सेनेचे स्वारगेट डेपो सचिव उल्हास बढे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महामंडळाचा निर्णय निश्‍चितच स्वागतार्ह असाच आहे. या निर्णयामुळे वाहक आणि चालकांना दिलासा मिळणार आहे.

सामाजिक संस्थांची मदत घेणार

img 20181228 wa00411838863096975407393

महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता महामंडळाला हा खर्च परवडणारा नाही त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन सामाजिक संस्थांना यासंदर्भात आवाहन करण्यात येणार आहे आणि त्या त्या भागातील सामाजिक संस्थांनी अशा प्रकारे तयारी दाखविल्यास त्यांच्याच माध्यमातून हा खर्च करुन घेण्यात येणार आहे व त्यांची तयारी असल्यास त्या संस्थेचे अथवा ते सुचवतील त्या व्यक्तीचे नाव संबधित विश्रामगृहाला देण्यात येणार आहे.

1 COMMENT

  1. विश्राम गृहाऐवजी जर कर्मचाऱ्यांना 10×10 च्या खोल्या बांधल्या तर कर्मचारयला त्याच्या फॅमिली सोबत राहता येईल परिणामी त्याचे कामात लक्ष लागेल
    साहेबाना एकच विनंती आपण देत असलेला घर भाडे भत्ता 429 रु आहे व प्रत्येक्षात मात्र 3500 रु पेक्षा कुठेच रुम मिळत नाही
    साहेबांनी 10 बाय 10 च्या रुम काढल्या तरी चालतील….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here