चालक कम वाहक जागा ८ हजार आणि अर्ज आले ४१ हजार…..

1
2412
st bharati

चालक कम वाहक जागा ८ हजार अर्ज आले ४१ हजार…..

सोलापूर : (सौ.सकाळ पेपर) परिवहन(MSRTC) महामंडळात चालक व वाहकांच्या आठ हजार 22 जागांची भरती निघाली आहे. त्यासाठी आतापर्यंत 41 हजार 717 उमेदवारांनी अर्ज केले असून त्यामध्ये सोलापूरसह दुष्काळी जिल्ह्यांमधील सर्वाधिक उमेदवार आल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाकडून सांगण्यात आले. जागा भरतीच्या तुलनेत पाचपट अर्ज आल्याने राज्यात बेरोजगारी वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्टार्टअप इंडिया च्या माध्यमातून राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा झाली. परंतु, बॅंकांना ढिगभर कागदपत्रे देऊनही वेळेवर पाहिजे तेवढे कर्ज मिळत नाही. दुसरीकडे सोलापूरसह अन्य दुष्काळी जिल्ह्यांमध्ये नवे उद्योगही पुरेशा प्रमाणात आले नाहीत. मागील काही वर्षांपासून खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाणही घटल्याचे चित्र आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन विभागाच्या या भरतीसाठी अनुसूचित जमातीच्या 685 जागा आणि तीन हजार अर्ज आले आहेत. महिला उमेदवारांनी मात्र या भरतीकडे पाठ फिरविल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे समांतर आरक्षणानुसार त्या जागांवर पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे. रिक्‍तपदांसाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऐजवी 22 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे.

राज्याची स्थिती :

एकूण जागा – 8,022
अर्ज – 41,717

महिलांसाठी जागा – 2,406
अर्ज – 953

अनुसूचित जमाती जागा – 685
अर्ज – 2,972

राज्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. मागील नोकरी भरतीवेळी 15 हजार जागांसाठी पाच लाखांपर्यंत अर्ज आले होते. आता आठ हजार जागांसाठी 40 हजारांहून  अधिक अर्ज आले आहेत. बेरोजगारी वाढल्याने लाखो अर्ज दाखल होतात परंतु, आवश्‍यक तेवढ्याचा जागा भरल्या जातील.

– दिवाकर रावते, परिवहनमंत्री

1 COMMENT

  1. साहेब …आता चालक तथा वाहक 8022 जागांची भरती परीक्षा झाली त्याचे पुढे काय …..पात्र झालेले उमेदवार यांना संधी मिळेल काय ………..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here