एसटी बस Live Location Track करा आता आपल्या मोबाईलवर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (Msrtc) यांच्या तर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी Vehicle Tracking System ( MSRTC Commuter App ) हे नवीन अँप तयार केले आहे ,हे अँप रेल्वे अँप वर आधारित आहे जशी रेल्वे कोणत्या ठिकाणी आहे किती वेळात पुढचे स्टेशन वर येईल ही माहिती समजते तशीच माहिती आता आपल्या एसटी ची सुद्धा समजणार आहे…
हे अँप गूगल प्ले स्टोर वर MSRTC Commuter App या नावाने उपलब्ध आहे, डाऊनलोड करून ते आपण वापरू शकता.
अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
सर्व हे अॅप सध्या ठराविक विभागात ठराविक ठिकाणी कार्य करत आहे व यावर अजुन काम चालू आहे व त्यामुळे लवकरच पूर्ण महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या बसेस बद्दलची live माहिती आपल्या मोबाईलवर (Mobile) आपल्याला पाहता येणार आहे…
अँप मध्ये आपल्याला खालील माहिती समजेल…
हे अँप GPS यंत्रणेवर काम करत असल्याने आपल्याला
- आपल्या जवळची बस स्थानके
- तेथे येणाऱ्या जाणाऱ्या बसेस
- बस कोठे आहेत
- बसचा पुढील स्टॉप कोणता.
- बसचा क्रमांक काय.
- बसचा मार्ग कोणता
- आपत्कालीन परिस्थितीत मदत
सध्या ह्या अँप वर फक्त पुणे मुंबई मार्गावर चालणाऱ्या शिवनेरी (SHIVNERI) बसेस व नाशिक विभागातील बसेस यांची माहिती मिळेल. इतर सर्व विभागाच्या बसेस ची माहिती लवकरच पाहायला मिळेल ह्या सर्व बसेस ऑनलाईन करण्याची प्रक्रिया चालू आहे व लवकरच पूर्ण करण्यात येईल….