बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले 60 लोकांचे प्राण

0
3530

MSRTC बस  चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले 60 लोकांचे प्राण

60 प्रवाशांचे यामुळे वाचला जीव….

धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावाजवळ msrtc बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला,यामुळे एखादी मोठी घटना घडू शकली असती, मात्र बस चालकाने प्रसंगावधान राखत बसची दिशा वळवली. यामुळे 60 प्रवाशांचे जीव वाचले आहेत.

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर गावाजवळील टोल नाका परिसरात नाशिकहून नंदुरबारकडे जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसचा ब्रेक अचानक निष्क्रिय झाला. यावेळी पांढऱ्या रंगाची एक कार बससमोरुन टोल गेटकडे जात होती. तेवढ्यात ब्रेक निष्क्रिय झाल्याचं बस चालकाच्या लक्षात आलं.

त्याने लगेच प्रसंगावधान राखत बस दुभाजकावरुन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेली. त्यानंतर काही अंतरावर गिअरच्या सहाय्याने चालकाने बसवर नियंत्रण मिळवले. चालकाचे जर प्रसंगावधान राखले नसते तर मोठी दुर्घटना घडू शकत होती. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here