सवलत माहिती

एसटी महामंडळ सवलती 

 एसटी महामंडळांकडून विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडयात सवलती देण्यात येत आहेत. रा.प. बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना –

अ. क्र.

सवलतींचा तपशील

सवलत अनुज्ञेय बससेवा प्रकार

प्रवास भाडयातील सवलत टक्केवारी

स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम, आराम १००
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम, आराम १००
अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इ. ५वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणार्या ग्रामीण भागातील विद्यार्थीनीसाठी साधी १००
शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार – ८००० कि.मी. प्रवासभाडे मूल्य आकारुंन अमर्याद प्रवास सवलत साधी, निमआराम,शिवशाही (आसनी व शयनयान) १००
राज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक साधी, निमआराम ५०
राज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक शिवशाही (आसनी) ४५
राज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक शिवशाही (शयनयान) ३०
विद्यार्थी मासिक पास सवलत साधी ६६.६७
विद्यार्थ्यांना नैमित्तिक करारावर देण्यात येणारी सवलत साधी ५०
विद्यार्थ्यांना मोठया सुटृीत मुळं गावी येणे जाणे, परिक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या/येण्या साठीची सवलत साधी ५०
अंध व अंपग व्यक्ती साधी, निमआराम ७५
१० अंध व अंपग व्यक्ती तसेच त्यांचे मदतनीस साधी, निमआराम ५०
११ क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठी साधी ७५
१२ कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी साधी ७५
१३ कृष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठी साधी ७५
सिकलसेल,एचआयव्ही बाधित,डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्ण वैदयकीय उपचारासाठी साधी/निमआराम १००
१४ राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी साधी ३३.३३
१५ विद्यार्थी जेवणाचे डबे साधी १००
१६ अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळांडू यांना वार्षिक २००० मुल्यापर्यंत साधी, निमआराम, आराम १००
१७ आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम, आराम १००
१८ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम, आराम १००
१९ पंढरपूर आषाढी/कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचे मान मिळांलेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी १३४७० पर्यंत मुल्या इतकी मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम १००
२० विधानमंडळं सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत सर्व प्रकारच्या बसेस १००
२१ माजी विधान मंडळ सदस्य व त्यांचे विवाहसाथी अथवा एक सहकारी यांना वर्षभर मोफत सवलत सर्व प्रकारच्या बसेस १००
२२ रेसक्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरिता साधी ६६.६७
२३ मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिक दृष्टया अपंग विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी साधी ६६.६७
२४ अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ति व त्यांचे साथीदार साधी, निमआराम १००
२५ कौशल्यसेतू अभियान अंतर्गत विद्यार्थी ६ महिने पर्यंत कालावधी असणाऱ्या कोर्सेस करीता साधी ६६.६७
२६ राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती साधी,निमआराम,आराम १००
२७ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना सर्व प्रकारच्या बसेस १००