नवी उमेद

0
1834
msrtc st mahila

MSRTC एसटी वर्कशॉपमधली मेकॅनिक वर्षा

नवी उमेद

नगरच्या तारकपूर msrtc आगारात एसटी दुरुस्तीचं काम करताना एक मुलगी नजरेस पडते. वर्षा गाढवे गेल्या चार महिन्यांपासून ‘मोटार मेकॅनिक’ म्हणून इथे काम करू लागली आहे. आत्तापर्यंत एसटीच्या वर्कशॉपमध्ये फक्त पुरुषच एसटी दुरुस्त करताना दिसायचे आता हे बदललं.msrtc st mahila

परभणी जिल्ह्या्तलं पूर्णा हे वर्षाचं माहेर. तिचा एक भाऊ रिक्षा चालवतो, तर दुसरा आयटीआयचं शिक्षण घेत आहे. आई-वडील मोलमजुरी करतात. कधी वडीलही रिक्षा चालवतात. वर्षा बारावीला विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाली,त्यानंतर आदर्श शिक्षिका होण्याच्या आशेने तिने डीएड केलं. काही दिवस एका खाजगी शाळेत नोकरी केली, मात्र वेतन अपुरं. मग ती नोकरी सोडली.

मार्च 2012 मध्ये औरंगाबादच्या संतोष गाढवे यांच्याशी तिचं लग्न झालं. संतोष औरंगाबादला आर्मी रिपोर्टीग कार्यालयात काम करतात.

सासरे ब्रह्मदेव गाढवे, रिक्षाचालक यांना सुनेची शिकायची आवड आणि त्यासाठी चाललेली धडपड जाणवली. त्यांनीच पुढाकार घेऊन वर्षाला आटीआयमध्ये ‘इलेक्ट्रीकल मेकॅनिक’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन दिला. शिकायचं तर स्वकमाईवर हे घरातल्यांनी सांगितलं. तेव्हा ती सासऱ्यांकडून रिक्षा चालवायला शिकली. आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करतानाच तिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएची पदवीही घेतली.

‘इलेक्ट्रीकल मेकॅनिक’ झाल्यावर वर्षाने औरंगाबाद एमआयडीसीत एका कंपनीत वर्षभर उमेदवारी केली. आणि आता एसटी msrtc वर्कशॉपमध्ये.

वर्षा सांगते की इथले जुने-जाणते अनुभवी मोटार मेकॅनिक सहकार्य करतात. आगारप्रमुख अविनाश कल्हापुरे सांगतात की, वर्षा यांची कामाबाबत कोणतीच तक्रार नाही.
“महिलांनी सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पाऊल टाकलं पाहिजे. मला शिक्षणाला पाठबळ देण्यासोबत रिक्षा चालवण्याला, एसटी महामंडळात नोकरी करण्यासाठी आई-वडील, सासरे, पती यांनी पाठबळ दिलं. मीही जिद्दीने परिश्रम घेतले. त्यामुळे यशस्वी मोटार मेकॅनिक होता आलं”_ , असं वर्षा यांनी सांगितलं.
_सलाम त्या शक्तीला_ ….

.हा मजकूर शेअर करून इतरांचीही उमेद वाढवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here