Blog

कोविड -१९ च्या परिस्थिती मध्ये काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्यशासनाच्या धर्तीवर ५० लाख रुपये आर्थिक मदत देणार मंत्री, अॅड. अनिल परब यांची घोषणा

0
my msrtc

एसटी कर्मचारी यांना 50 लाख रुपयाचे विमा कवच कोविड -१९

एसटीच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त….
कोविड -१९ च्या परिस्थिती मध्ये काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्यशासनाच्या धर्तीवर ५० लाख रुपये आर्थिक मदत देणार मंत्री, अॅड. अनिल परब यांची घोषणामुंबई (१ जून) एसटीच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त, कोविड-१९ च्या परिस्थितीमध्ये, आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना (कोविड-१९ मुळे मृत्यू आल्यास त्यांच्या कुटुंबियांना) राज्यशासनाच्या धर्तीवर ५० लाख रुपये आर्थिक मदत एसटी महामंडळातर्फे देण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केली आहे. व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे राज्यातील विविध एसटी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी तसेच विभाग नियंत्रकांशी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, भर उन्हामध्ये रस्त्याने पायपीट करत, चालत जाणाऱ्या परप्रांतीय श्रमिकांना आपल्या एसटीने मोलाचा आधार दिला आहे. राज्यशासनाच्या निर्देश नुसार ९ मे पासून ३१ मे पर्यंत एसटीच्या तब्बल ४४ हजार १०६ बसेस द्वारे सुमारे ५ लाख ३७ हजार ५९३ श्रमिकांना मोफत त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत अथवा नजीकच्या रेल्वे स्थानक पर्यंत सुखरूप नेऊन सोडण्याचे काम एसटीच्या बहाद्दर कर्मचाऱ्यांनी करून दाखवले आहे.या कामाचे कौतुक खुद्द सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही केले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी काम करणारे कोविड योद्धे (डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी), विद्यार्थी, ऊसतोडणी कामगार मजूर अशा विविध घटकांचे ‘सारथ्य’ करण्याचे शिवधनुष्य एसटीने लीलया पेलले आहे. अर्थात, १ जूनला आपला “७२ वा वर्धापन दिन” साजरा करणाऱ्या ‘एसटी’ साठी हि अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. यासाठी कार्यरत असलेले एसटीचे सर्व कर्मचारी, पर्यवेक्षक, व अधिकारी कौतुकास पात्र आहेत. परंतु, कोविड च्या संकट नंतर एसटीच्या आर्थिक स्थितीला सावरून पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांचे सकारात्मक योगदान आवश्यक असणार आहे. त्यासाठी नाविन्यपूर्ण सूचना व मार्गदर्शनाचे एसटीच्या वरिष्ठ प्रशासनाकडून स्वागतच केले जाईल याची त्यांनी ग्वाही दिली.
गेल्या ७२ वर्षांमध्ये महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून काम करणाऱ्या एसटीने सर्वसामान्य प्रवाशी जनतेची विश्वाहर्ता जपली आहे, एवढंच नव्हे,तर या संकट प्रसंगी सगळे जग स्तब्ध झाले असताना , एसटीने मात्र वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदतीचा हात देऊन आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. येणार काळ अत्यंत खडतर असून ,अगोदरच सुमारे ६ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा सहन करणाऱ्या एसटीला भविष्यात माल वाहतुकीसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे लागणार आहेत. तसेच उपलब्ध साधन सामग्रीचा अत्यंत नियोजनपूर्वक व काटकसरीने उपयोग करून, किमान तोटा होणार नाही इतपत कार्यक्षमता वृद्धिंगत करणे आवश्यक आहे.
यावेळी एसटीच्या प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना, एसटीच्या गतवैभवाला गवसणी घालण्यासाठी सर्वांनीच अपार कष्ट घेऊन येणाऱ्या ७३ व्या वर्धापन दिनी एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची शपथ घेऊया असे प्रतिपादन मंत्री, अॅड. अनिल परब यांनी केले आहे. या प्रसंगी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चन्ने यांच्यासह एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जनसंपर्क अधिकारी
एसटी महामंडळ

तीन दिवसांत एसटीने २१ हजार ७१४ श्रमिक – मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहचविले..

1
corona pravashi vahatuk

मंत्री, अॅड.अनिल परब यांची माहिती…
मुंबई (११ मे ) राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने गेल्या तीन दिवसांत (९मे-११ मे २०२०) आपल्या विविध आगारातील तब्बल ११६९ बसेसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे २१ हजार ७१४ श्रमिक – मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचविले आहे,अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.
माहिती देताना ते पुढे म्हणाले की,दि.११ मे या एका दिवसात ठाणे,नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागातील ५३० एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या ११ हजार ८६६ मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटकातील सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले . अशा प्रकारे गेल्या तीन दिवसांत २१ हजार ७१४ मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात एसटी प्रशासन यशस्वी झाले आहे.
” भर उन्हात पायपीट करीत चाललेल्या या हजारो मजुरांना एसटी बसेस मध्ये बसवुन, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात, एसटी कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावत आहेत.” त्यामुळे हे सर्व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत. असे अॅड.परब यांनी एसटी कर्मचाऱ्या बद्दल गौरव उद्गार काढले आहेत.या बरोबर काही ठिकाणी आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था देखील एसटी महामंडळाकडून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यापुढे देखील लाॅक-डाउन संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजूरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे व तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील श्रमिकांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहिम एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.तरी त्यांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता , एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी केले आहे.


जनसंपर्क अधिकारी
एसटी महामंडळ

Facebook post

दिवसभरात एसटीने ८ हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहचविले.

1
msrtc


मुंबई (१० मे ) परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने आपल्या विविध आगारातील बसेसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे ५ हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविले आहे.
नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर अशा विविध विभागातील सुमारे २५० एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या सुमारे ५ हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले . त्याचबरोबर परतीच्या प्रवासात सीमेवर अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील सुमारे ३ हजार मजुरांना सुखरूप त्यांच्या इच्छीत जिल्हा ठिकाणी आणण्यात आले.अशा प्रकारे आज दिवसभरात सुमारे ८ हजार मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्याचे शिवधनुष्य एसटीने लिलया पेलले आहे.
भर उन्हात पायपीट करून व्याकुळ झालेल्या मजुरांना अत्यंत आपुलकीने विचारपूस करून एसटी बसेस मध्ये बसवुन, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले.काही ठिकाणी आवश्यकतेनुसार त्यांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली.याबध्दल या मजुरांनी एसटी महामंडळाचे व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.यापुढे देखील लाॅक-डाउन संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजूरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे व तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील मजुरांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहिम एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.तरी कष्टकरी कामगार-मजूरांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता तुमच्या सेवेसाठी दिवस-रात्र राबत असलेल्या एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी केले आहे.
जनसंपर्क अधिकारी
एसटी महामंडळ

एसटी स्मार्ट काढण्यास 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

0

एसटीच्या ” स्मार्ट कार्ड ” ला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ..!
मंत्री, अॅड. अनिल परब यांची माहिती..
मुंबई : (४ मे ) करोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ” स्मार्ट कार्ड ” योजनेला 15 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते.या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ” स्मार्ट कार्ड “ काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे .परंतु करोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने सदर योजनेला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंत्री,परब यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
जनसंपर्क अधिकारी
एसटी महामंडळ

एस टी ने शिकवल….

1
my msrtc

एस टी ने शिकवल…

कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?


दोन तीन दिवसांपूर्वी मी अशोका हॉस्पिटल मधे आमच्या मित्राच्या मिसेसला बघायला गेलो होतो. लिप्ट वरुन खाली जातांना त्या लिप्ट मधे उभ्या असलेल्या का एका माउलीचे अश्रु डोळ्यात तरळतांना दिसले मी त्यांच्या जवल उभ्या असलेल्या एका व्यक्तीला विचारले काय झाल? त्याने सांगितल काही नाही सर जीववनाचे भोग आहेत भोगतोय. तेवढ्यात लिप्ट ग्राउंड फ्लोर आली मी त्यांच्या बरोबर उतरलो त्या माणसान मला थांबून घेत म्हटल साहेब माझा मित्र अंथरुणावर खिळुन आहे एस टी त ड्राइवर आहे परवा मनमाड जवळ जो अपघात झाला त्यातील वाहक होता सोनवणे आड़नाव आहे व दुगावचे राहणार आहे. नेमक काय झाल अस मी विचारल! पोटात स्टेरिंग गेलीये साहेब दोन दिवसांपासून इथे ऑडमिट आहे रिटायरमेंटला फक्त अडीच वर्ष राहिलेत अन त्यात हा दवाखाना जन्म मृत्युच्या खेळात अडकलाय माझा मित्र अस म्हणून त्याच्याही डोळ्यात अश्रु आले. होतील बरे अस म्हणून मी निघता निघता म्हटल महामंडळ करेल सगळा खर्च त्यावर तो म्हटला नाही साहेब, मी पुढे जाऊन माघारी आलो अन विचारल अस का? नुसता प्रवासी जखमी होतो तरी एस टी मददत करते मग यांचा खर्च का करणार नाही. साहेब तशी प्रोविजन नाही आम्ही फक्त गाड़ी चालवायची जीवाच काही झाल तरी एस टी भरपाई देत नाही. मी म्हटल साहेब तुम्हाला माहिती नसेल, तो इसम मला म्हटला साहेब मी पण एस टी तच आहे अशी कुठलीच सुविधा आम्हाला नाही ऐकून मन सुन्न झाल त्यांनी अजुन एक बाब निदर्शनास आणून दिली ती म्हणजे साहेब दवाखान्यात देखील आम्ही घेऊन आलो व जी उचल म्हणून 1 लाख रुपये देतांना देखील खुप वेळा चक्कर मरावे लागले. हे सार ऐकून मनात एक विचार आला ज्या समतेसाठी छत्रपती शाहु ,महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,अहिल्याबाई होळकर जीवनभर लढले ही तीच का समता ज्या एस टी ला आपला परिवार समजून राबणाऱ्या कर्मच्यारयाला आपघाता नंतर वारयावर सोडून दिले जाते.आपघात हा आपघात असतो मग यांच्यावर हा अन्याय का? सवलतींचा लाभ घेणारया राज्याच्या सर्व आमदार,खासदार यांना ह्या गरीबांच दुःख कधी समजेल सरकारी असो की खाजगी सगळी कड़े समानता असावी अस मला वाटल. गडग़ंज्य पगार असणाऱ्यांना सरकार सगळ्या सुविधा देत मग तोड़का पगार असलेल्या ह्या कामगारांचे काय ते पण देशसेवाच करतात. दिवाळी असो की दसरा एस टी चालूच असते सासरी गेलेल्या पोरीला माहेरी घेऊन येते पण ह्या कर्मच्यारयाच्या परिवारातील पोरीला आपल्या वडिलांशिवाय दिवाळी साजरी करावी लागते. सैनिका सारखा त्याग माझा एस टी कर्मचारी करतो राष्ट्रानिर्मितीत त्याचा हातभार फार मोठा आहे पण तो दुर्लक्षित आहे. राष्ट्रनिर्मितीत ज्यांच योगदान आहे त्या सर्वांना सुविधा समान हव्या ज्यात शेतकरी आले कामगार आले तसेच एस टी कामगारांसारखे असंख्य दुर्लक्षित घटक ज्यांचे योगदान फार मोठे आहे मग त्यांवर अन्याय का? 5 दिवसाचा आठवडा यांना लागू होत नाही शिक्षणाण माणसाचा दर्जा ठरवणाऱ्या मानसिकतेतुन आपन बाहेर निघाल पाहिजे. राष्ट्रानिर्मितीत ज्यांचा हातभार लागतो त्या सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे मग तो कुठल्याही गोष्टित असो.
एस टी कर्मचारी सोनवणे व त्यांसारखे असंख्य एस टी कर्मचारी यांना न्याय द्यावा बस इतकच. अश्रु कुठल्याही डोळ्यातुन निघाले तरी अश्रु भारतीय आहेत हे सगळ्यांनी समजून घेतल पाहिजे. मोठ्या पगाराच्या कर्मच्यारयांना अवास्तव सुविधा आहेत पण छोट्या पगारवाल्यांना त्याच सुविधा का नको याचा विचार व्हायला हवा शिक्षणाण नक्कीच पगार कमी जास्त व्हायला पाहिजे. पण सुविधा समान हव्या कारण भारतीय माणूस म्हणून सुविधा दया मग तो सरकारी कर्मचारी असो की शेतकरी की कामगार राष्ट्रानिर्मितीत सगळ्यांचा वाटा आहे मगच ह्या देशात समानता येईल.नाहीतर महा पुरुषांनी पहिलेल स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही.
जय शिवराय

लेखन:- प्रशांत भामरे………………

Copy From Facebook …

एसटी बस live लोकेशन App झाले चालू.,पहा आपली एसटी कुठे आहे.

0
msrtc live

एसटी बस Live Location Track करा आता आपल्या मोबाईलवर

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (Msrtc) यांच्या तर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी Vehicle Tracking System ( MSRTC Commuter App )  हे नवीन अँप तयार केले आहे ,हे अँप रेल्वे अँप वर आधारित आहे  जशी रेल्वे कोणत्या ठिकाणी आहे किती वेळात पुढचे स्टेशन वर येईल ही माहिती समजते तशीच माहिती आता आपल्या एसटी ची सुद्धा समजणार आहे…

हे अँप गूगल प्ले स्टोर वर MSRTC Commuter App  या नावाने उपलब्ध आहे, डाऊनलोड करून ते आपण वापरू शकता.

अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

download app

सर्व हे अॅप सध्या ठराविक विभागात ठराविक ठिकाणी कार्य करत आहे व यावर अजुन काम चालू आहे व त्यामुळे लवकरच पूर्ण महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या बसेस बद्दलची live माहिती आपल्या मोबाईलवर (Mobile) आपल्याला पाहता येणार आहे…

 

अँप मध्ये आपल्याला खालील माहिती समजेल…

हे अँप GPS  यंत्रणेवर काम करत असल्याने आपल्याला

  • आपल्या जवळची बस स्थानके
  • तेथे येणाऱ्या जाणाऱ्या बसेस
  • बस कोठे आहेत
  • बसचा पुढील स्टॉप कोणता.
  • बसचा क्रमांक काय.
  • बसचा मार्ग कोणता
  • आपत्कालीन परिस्थितीत मदत

live buslive traking app

live traking appसध्या ह्या अँप वर फक्त पुणे मुंबई मार्गावर चालणाऱ्या शिवनेरी (SHIVNERI) बसेस व नाशिक विभागातील बसेस यांची माहिती मिळेल. इतर सर्व विभागाच्या बसेस ची माहिती लवकरच पाहायला मिळेल ह्या सर्व बसेस ऑनलाईन करण्याची प्रक्रिया चालू आहे व लवकरच पूर्ण करण्यात येईल….

माऊलीला आपल्या लेकरा पर्यंत आणणारी एस टी

0
msrtc photo
  • माऊलीला आपल्या लेकरा पर्यंत आणणारी एस टी ( Msrtc)

अरं लेका, मी पोचली रं, येतेच १० मिनटात. स्टँड वर येतुयेस नव्हं घ्यायाला .

जन्मापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आपला लाडका लेक शिक्षण झाल्यावर कामानिमित्ताने गावाहून मुंबईला आला. आणि गावाला पारखा झाला. पुढे वर्षात अगदी मोजक्याच दिवशी जेव्हा तो सुट्टीला घरी येतो, तेव्हा त्याची उठबस करण्यात आणि लाड करण्यातच वेळ कसा जातो कळत नाही, आणि तो जाण्याची वेळ येते. मग साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला जातो. लग्नानंतर तर गावाकडे येणे पण जमत नाही. मग लेकाला – सुनेला – नातवांना भेटायला ती आई शहरात येते. येते वेळी आपल्या लेकाला गावचे धान्य, भाज्या वगैरे काय काय घेऊन येतात. वडील मात्र गावी घरीच. अशीच ही एक गावाकडची आई .

त्यांना लेकाला भेटण्याची एवढी ओढ, की पनवेल यायला अजून १०-१५ मिनिट्स असताना देखील आधीच पुढे येऊन बसल्या. सोबत सामान तर अबब! एस टी मध्ये समोरच्या जागेत खूप ह्यांचेच सामान ठेवले होते. सोबत हरभरा तो ही पाल्यासकट. ताजा ताजा शेतातून आणलेला. पनवेल आल्यावर त्यांच्या डोळ्यातली आर्तता सर्व काही सांगून जात होती. लेकाला लगेच फोन लावला आणि म्हणाल्या, ” अरं लेका, मी पोचली रं, येतेच १० मिनटात. स्टँड वर येतुयेस नव्हं घ्यायाला “.

न जाणो, अशा कित्येक माऊली आणि वडील आपल्या लेकांसाठी गावाहून मुंबई – पुण्यात येतात आणि ४ दिवस आनंदात घालवून पुन्हा गावी परततात .

शेवगाव ( अहमदनगर जिल्हा ) – मुंबई सेंट्रल बसने येणारी ही माऊली लाडक्या लेकाशी फोनवर बोलताना.

लेखक माहित नाही फेसबुक वरून पोस्ट….

एस टी प्रवासभाडे सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास 1 एप्रिल 2020 पर्यंत मुदतवाढ

0

एस टी प्रवासभाडे सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास 1 एप्रिल 2020 पर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. २६

राज्य परिवहन (एस टी) महामंडळाच्यावतीने विविध सामाजिक घटकांना एस टी प्रवासभाडे सवलतीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्टकार्ड’ योजना बंधनकारक करण्यास 1 एप्रिल 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय़ महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात नागपूर अधिवेशनादरम्यान विविध लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी परिवहनमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने विविध घटकांसाठी १ जून २०१९ पासून स्मार्टकार्ड योजना सुरू करण्यात आली असून सद्यस्थितीत ३० लाख ९७ हजार ७२६ जणांची नोंद झाली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, विद्यार्थी तसेच व्याधीग्रस्त रुग्णांना ३१ डिसेंबर 2019 पर्यंत स्मार्टकार्ड मिळविणे आवश्यक होते. नोंदणीला मिळालेला प्रतिसाद पाहता ही मुदत वाढून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. त्यास परिवहन मंत्री श्री. देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, अधिस्विकृतीधारक पत्रकार तसेच व्याधीग्रस्त रुग्ण यांना स्मार्टकार्ड ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्राप्त करणे आवश्यक होते. परंतु आता ही मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे व 1 एप्रिल 2020 पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.

मासिक,त्रैमासिक पासधारकांना स्मार्टकार्ड १५ फेब्रुवारी २०२० पासून बंधनकारक करण्यात येत आहे.

तसेच विद्यार्थ्यांसाठी १ जुन २०२० पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.

दिव्यांगांसाठी अद्याप स्मार्टकार्ड योजना लागु करण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांगांसाठी सद्याचीच कार्यपद्ध्‍ती लागु राहील. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

सर्व घटकांनी विहित कालावधीत स्मार्टकार्ड प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2430620207203228&id=1966653206933266

व्यथा एसटी (Msrtc) ची

0

एसटी (Msrtc) ची व्यथा आवडले तर अभिप्राय द्या….

एसटी म्हणाली माझ्यापाशी आहेत अनुभव रग्गड

कितीतरी आंदोलनात माझ्यावरच पहिला दगड

पिसाट होऊन धावतात येतात माझ्या अंगावर

भरवसा तरी नेमका आता ठेवू कोणत्या रंगावर

कधी उभी पेटवतात कधी काचेवरच भागते

भर रस्त्यात वस्त्रहरण सहन करावे लागते

जखम असेल मामुली तर मलमपट्टी लावते

पुन्हा नव्या दमाने सेवेसाठी धावते

मी असहाय म्हणूनच सोकावलेत सारे षंढ

माझ्या मनातला ज्वालामुखी भविष्यात करेल बंड

तुमच्याच आया बहिणींना लेकरांना नेते मजेने

तुम्ही मात्र परतफेड करता नेहमी सजेने

तुमच्या भंपक ‘मर्दानगी’ची किळस

आता यायला लागली

तुमच्यामुळे पोरं सोरंहीहाती दगड घ्यायला लागली

वस्ती गाव शहरांपर्यंत पोचवा माझी व्यथा

हीच विनंती शेवटची समजून घ्यावे

आता सांगतोय माझ्यावर पडलेला दगड अन पेटता बोळा

दंगेखोर पकडून सारेच भरपाई करा गोळा

© Murari Deshpande

एसटी बसच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार मोबाईलवर

0
live st location
दिवाकर रावते यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा प्रारंभ

img 20190821 1038504237300188981117488 1

एसटी बसच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार

मुंबई, दि. २० : एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन दर्शविणाऱ्या तसेच ही माहिती एलसीडी टीव्ही संचाद्वारे बसस्थानकांवर प्रसारित करणाऱ्या वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणालीचा (vehicle tracking and passenger information system) आज परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या नव्या प्रणालीमुळे एसटी बस कोणत्या ठिकाणी पोहोचली आहे, हे प्रवाशांना समजू शकणार आहे. तसेच बसस्थानकावर एलसीडी टिव्ही संचाद्वारे एसटी गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची व सुटण्याची वेळ कळणार आहे. आपल्या जवळील थांब्यावरून प्रत्यक्ष येणाऱ्या व सुटणाऱ्या फेऱ्यांची वेळ कळणार असल्याने प्रवाशांना प्रवासाचे पूर्वनियोजन करता येईल व त्यांचा अमुल्य वेळ वाचणार आहे.एसटी महामंडळाच्या नाशिक विभाग व मुंबई – पुणे – मुंबई, बोरीवली – पुणे -बोरीवली, ठाणे – पुणे – ठाणे या शिवनेरी सेवेचा व्हिटीएस – पीआयएस प्रकल्पाचे आज लोकार्पण करण्यात आले. पुढील ५ ते ६ महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात वाहनांना व्हीटीएस (vehicle tracking system) बसविण्यात येऊन सर्व महत्वाच्या थांब्यावर पीआयएस संच (passenger information system) बसविण्यात येणार आहे. याबाबतचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच प्रवाशांना बसचे लोकेशन समजण्यासाठी मोबाईल ॲप तयार करण्यात येत असून ते लवकरच ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.प्रणालीच्या प्रारंभ प्रसंगी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, महाव्यवस्थापक राहूल तोरो, उपमहाव्यवस्थापक सुहास जाधव आदी उपस्थित होते.श्री. रावते म्हणाले, ‘जिथे रस्ता, तिथे एसटी’ या ब्रिदवाक्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर एसटी महामंडळ सेवा देत आहे. महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार बसेस असून त्यामार्फत दररोज ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी कामकाजात सुसूत्रता आणणे तसेच संपूर्ण कार्यक्षमतेने काम होण्यासाठी एसटी महामंडळामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसटीत वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणाली (vehicle tracking and passenger information system) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना एसटी बसचे प्रत्यक्ष स्थान कळणार आहे. प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या एसटी बस थांब्याचे, गावांचे जीपीएस तंत्रज्ञानाव्दारे अक्षांश व रेखांशाव्दारे नकाशावर स्थान निश्चित करण्यात येत आहे. तसेच ज्या आंतरराज्य मार्गावर एसटी महामंडळाची सेवा आहे अशा थांब्याचेही स्थान निश्चितीकरण करण्यात येत आहे.व्हिटीएस-पीआयएस प्रकल्पाच्या अंतर्गत एक मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय, मुंबई सेंट्रल येथे तयार करण्यात आलेली आहे. या नियंत्रण कक्षामध्ये व्हिडीओ वॉल तयार करण्यात आली असून तेथे एसटी बसेसचे निरीक्षण करण्यात येणार आहे. यात वाहनाचा वेग, वाहनाचे आगमन व निर्गमन तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक अहवाल प्राप्त होणार आहे.