दुष्काळी जिल्ह्यात एसटी ची ४४१६ पदासाठी चालक तथा वाहक जाहिरात

0
1816

दुष्काळी भागातील जिल्हासाठी एसटी ची ४४१६ चालक तथा वाहक पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जालना,औरंगाबाद,अमरावती  परभणी, अकोला, यवतमाळ,बुलढाणा,  धुळे, नाशिक, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण तसेच केंद्र शासनाने नुकतेच जाहीर केलेले १० टक्के आर्थिक दुर्बल आरक्षण यात आहे. १६ जानेवारीपासून ही जाहिरात msrtc.gov.in व msrtcexam.in या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. पदांसाठी अर्ज भरण १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. चालक तथा वाहक म्हणजे चालक व वाहक पदाची एकत्रित पात्रता  पूर्ण करणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

पात्रता

१)  उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा  परवाना असणे आवश्यक

२)  उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक

३)  उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा

४) उमेदवाराकडे आर टी ओ चा चालक आणि वाहकाचा बिल्ला असणे आवश्यक

दुष्काळी जिल्ह्यातील तरुणांसाठी एस.टी.ची ४४१६ चालक तथा वाहक पदाची जाहिरात.औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे व सोलापूर या १२ जिल्ह्यांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.१६ जानेवारीपासून ही जाहिरात msrtc.gov.in व msrtcexam.in या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here