एसटी महामंडळ नवीन बसेस आणणार

2
5037

एसटी महामंडळ नवीन बसेस आणणार

खासगी बसेसच्या स्पर्धेत टिकण्यासाठी 1200 नवीन बसेस ताफ्यात आणण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या बस खरेदीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून बसेसची बांधणी अत्याधुनिक व आकर्षक पद्धतीने होण्यासाठी त्यांची बांधणी खासगी कंपन्यांकडून करुन घेण्यात येणार आहे.

IMG 20180120 WA0045

या बसेसमध्ये 700 साध्या आणि 500 शिवशाही बसेसच्या चॅसिज घेण्याची प्रक्रिया महामंडळाने पूर्ण केली आहे, या बसेस बांधणीसाठी नामांकित खासगी कंपनीला पाठविण्यात येणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना बांधणीची माहिती असली तरी एक प्रयोग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बसेस येण्याच्या आधी महामंडळाच्या वतीने सर्व आगारांमधील बसेसचा आणि तेथून मिळणाऱ्या महसूलाचा अंदाज घेण्यात येत आहे. त्याशिवाय संबधित आगारांमध्ये प्रवाशांच्या तुलनेत किती बसेस कमी पडतात याचीही माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर त्या त्या अंदाजानुसार या बसेसची वाटणी करण्यात येणार आहे.

2 COMMENTS

  1. एसी असेल तर बाहेर बांधणी करा. नाँन एसी असेल महामडंळात बाधणी करावी .बाहेर बाधणी म्हणजे एसटी कर्मचार्यावर अविश्वास दाखवत आहे .यातुनच खाजगी करण होण्याची शक्यंता आहे .बाधणी बाहेर करायची मग सहाय्यंक भरती प्रक्रिया करणार नाहीत .बाधणी महामडंळातच करावी हि विनंती आहे .

  2. फार अवघड आहे लालपरी लोकऊपयूत शेवा अााहे ति टीकली पाहीजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here